रस्ते विकास

रस्ते विकास

वाघोली परिसराचा गतिमान आणि नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आवश्यक होती. यामध्ये रस्ते विकास हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरला आहे. हजारो नागरिक, सोसायट्या, गृहनिर्माण प्रकल्प, व्यवसायिक यांची दैनंदिन हालचाल सुलभ होण्यासाठी खालील महत्त्वपूर्ण रस्त्यांची कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.

महत्त्वाच्या अंतर्गत रस्ते

वाघोलीतील वॉर्ड क्रमांक सहा मधील डोमखेल रोड परिसर, केसनंद रोड, आव्हाळवाडी रोड, काळूबाई नगर, शांती पार्क अशा भागातील सर्व नागरी वसाहती, सोसायटी यांचे अतंर्गत रस्ते काँक्रिटचे करुन नागरिकांचा दिर्घ काळ प्रलंबीत असलेला रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला.

वाघोली ते केसनंद रस्ता

वाघोली व केसनंद या दोन्ही गावांना जोडणारा हा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. परिसरातील अनेक सोसायट्या, प्रकल्प व व्यवसायिक या मार्गावर अवलंबून होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही तोडगा न निघाल्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. मंत्री आणि बांधकाम विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत अखेर हा रस्ता मंजूर झाला आणि आज नागरिकांना या मार्गाचा मोठा लाभ होत आहे.

वाघोली–आव्हाळवाडी रस्ता

हा रस्ता सोलापूर रोड आणि नगर रोड या दोन राज्य महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. परिसरातील अनेक सोसायट्या, नागरी वस्ती आणि व्यवसायिक यांच्यासाठी हा रस्ता अतिशय महत्त्वाचा होता. याचबरोबर आव्हाळवाडी चौकाचे विस्तारीकरण देखील करण्यात आले, ज्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली.

पुणे–अहिल्यानगर महामार्ग रुंदीकरण

या महामार्गावर वाहतूक खूप वाढल्यामुळे जुना रस्ता अपुरा पडत होता. PMRDA कडे सातत्यपूर्ण पाठपुरावा व आंदोलन केल्यानंतर अखेर ₹11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. रस्ता रुंद झाल्याने वाहतूक कोंडी दूर झाली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बस स्टॉप मागील रस्ता व शांती पार्क जोड रस्ता

वाघोली बस स्टॉप मागील रस्ता हा अनेक वर्ष खड्डेमय होता. हा रस्ता आव्हाळवाडी रोड, केसनंद रोड आणि काळूबाई नगर लेन यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग होता. तसेच शांती पार्क ते केसनंद रोडला जोडणारा मार्गही तयार करण्यात आला. दोन्ही रस्त्यांमुळे चौक मोठा झाला, वाहतूक सुधारली व परिसरातील नागरी सुविधा बळकट झाल्या.