वाघोली ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच म्हणून काम करताना वॉर्ड क्र. 6 मध्ये 24 कोटींचा निधी आणून रस्ते, पाणी, ड्रेनेज, उद्यान, गॅस लाईन, पाणी लाईन, भाजी मंडई शेड यांसह अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या. वाघोलीचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर शासन नियुक्त समितीवर सदस्य म्हणून निर्णायक भूमिका बजावली. भाजप युवा मोर्चा, पुणे जिल्हाध्यक्ष या नात्याने उत्तर पुणे जिल्ह्यातील युवकांसाठी नोकरी, शिक्षण आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संघटन यासाठी योजनाबद्ध कार्य केलं.
शाळा-कॉलेजच्या अतिरिक्त फीविरोधात आंदोलने करत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. वाहतूक कोंडीवर वेळोवेळी उपाययोजना व अंमलबजावणी केल्या. मूळा-मुठा नदीपर्यंत 6 किमी मुख्य व अंतर्गत ड्रेनेज लाईन मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते केले.
रत्नदीप सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा म्हणून सामाजिक कार्यातून आपली ओळख निर्माण करणाऱ्या सौ. रत्नमाला संदीप सातव या आज वाघोली परिसराच्या लोकाभिमुख नगरसेविका आहेत. समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे तातडीने निराकरण हे त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय आहे. २०२६ मध्ये त्या पुणे महानगरपालिकेच्या खराडी–वाघोली प्रभागातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या.
जनतेसाठी सातत्याने कार्यरत नेतृत्व
नगरसेविका झाल्यानंतर त्यांनी वाघोलीतील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट, स्वच्छता आणि इतर नागरी समस्यांवर सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत संबंधित विभागांशी समन्वय साधून कामे मार्गी लावणे ही त्यांच्या कार्यपद्धतीची खास ओळख आहे.
वाघोलीमध्ये वार्ड क्रमांक 6 मध्ये अनेक वर्ष ड्रेनेजचा विषय प्रलंबीत होता. रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत होती.
वाघोली परिसराचा गतिमान आणि नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आवश्यक होती.
पाणीपुरवठा या समस्येचे कायमस्वरूपी समाधान व्हावे यासाठी विविध पातळ्यांवर सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले.
वाघोली परिसरातील नागरिकांना गेल्या काही काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे यांसारख्या समस्या जाणवत होती .
रत्नदीप सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. रत्नमाला संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली एक नवसंजीवनी निर्माण झाली आहे.
वाघोली परिसरात नागरिकांसाठी आधार कार्ड, मतदान कार्ड कॅम्प आयोजित करून महत्त्वाची कागदपत्रे सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यात आली.