आमच्याबद्दल

लोकसेवेची वाटचाल.....

वाघोली ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच म्हणून काम करताना वॉर्ड क्र. 6 मध्ये 24 कोटींचा निधी आणून रस्ते, पाणी, ड्रेनेज, उद्यान, गॅस लाईन, पाणी लाईन, भाजी मंडई शेड यांसह अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या. वाघोलीचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर शासन नियुक्त समितीवर सदस्य म्हणून निर्णायक भूमिका बजावली. भाजप युवा मोर्चा, पुणे जिल्हाध्यक्ष या नात्याने उत्तर पुणे जिल्ह्यातील युवकांसाठी नोकरी, शिक्षण आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संघटन यासाठी योजनाबद्ध कार्य केलं.

शाळा-कॉलेजच्या अतिरिक्त फीविरोधात आंदोलने करत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. वाहतूक कोंडीवर वेळोवेळी उपाययोजना व अंमलबजावणी केल्या. मूळा-मुठा नदीपर्यंत 6 किमी मुख्य व अंतर्गत ड्रेनेज लाईन मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते केले.

रत्नदीप सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. रत्नमाला संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली

Wagholi Women’s Premier League  यामध्ये 53 संघांनी भाग घेतला तर 650 पेक्षा जास्त महिला खेळाडूंनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला…

• Wagholi Flea Nest - 200 पेक्षा महिला उद्योजकांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुण दिले. 20 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी या Fleaला भेट दिली…
• "लाडकी बहीण सक्षमीकरण मोफत कार्यशाळा" - 1000 पेक्षा जास्त महिलांचा सहभाग
• अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे…

विशेष भर असलेली क्षेत्रे

ड्रेनेज कामे

वाघोलीमध्ये वार्ड क्रमांक 6 मध्ये अनेक वर्ष ड्रेनेजचा विषय प्रलंबीत होता. रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत होती. 

रस्ते विकास

वाघोली परिसराचा गतिमान आणि नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आवश्यक होती. 

पाणीपुरवठा

पाणीपुरवठा  या समस्येचे कायमस्वरूपी समाधान व्हावे यासाठी विविध पातळ्यांवर सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले.

वीजपुरवठा

वाघोली परिसरातील नागरिकांना गेल्या काही काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे यांसारख्या समस्या जाणवत होती . 

महिला सक्षमीकरण

रत्नदीप सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. रत्नमाला संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली एक नवसंजीवनी निर्माण झाली आहे.

सामाजिक व धार्मीक उपक्रम

वाघोली परिसरात नागरिकांसाठी आधार कार्ड, मतदान कार्ड  कॅम्प आयोजित करून महत्त्वाची कागदपत्रे सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यात आली.

संदिप (आबा) सातव हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे चे जिल्हाध्यक्ष आहेत. हे गेल्या 15 वर्षांहून अधिक काळापासून समाजसेवा आणि लोकहितासाठी काम करत आहेत.