प्रभू श्रीराम उद्यान

प्रभू श्रीराम उद्यान

प्रभू श्रीराम उद्यान हा वाघोलीसाठी ऐतिहासीक प्रकल्प आहे. गणेश नगर भागात ज्याठिकाणी अनेक वर्ष सांडपाणी, मल-मुत्र सोडले जात होते, त्याठिकाणी आज प्रभू श्रीरामांच्या नावाने नंदनवन फुललं आहे. ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच पदावर असताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून 16 लाख व वैयक्तिक 20 लाख रुपये खर्चुन अवघ्या एका वर्षात “प्रभू श्रीराम उद्यान” उभारले गेले. आता लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी यांच्यासाठी हे उद्यान एक आनंददायी निवांतस्थळ झाले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासाठी हा खूप सुखावणारा क्षण आहे…