सामाजिक व धार्मिक उपक्रम

सामाजिक व धार्मिक उपक्रम

वाघोली परिसरात नागरिकांसाठी आधार कार्ड, मतदान कार्ड व पासपोर्ट कॅम्प आयोजित करून महत्त्वाची कागदपत्रे सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यात आली. धार्मिक आणि सांस्कृतिक जाणीवा वृद्धिंगत करण्यासाठी गणराज तरुण मंडळाच्या माध्यमातून अनेक वर्ष गणेशोत्सव, तसेच प्रभू श्रीराम नवमी, हनुमान जयंती, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या महत्त्वपूर्ण सणांचे उत्साहात आयोजन तर सक्रिय सहभाग घेतला.

स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्यानिमित्त सामूहिक भजन, नामस्मरण आणि अन्नदानाचे कार्यक्रम राबविले. या सर्व उपक्रमांतून सामाजिक एकात्मता, राष्ट्रभक्ती व सार्वजनिक सहभाग यांना चालना देण्यात आली.