पाणीपुरवठा

पाणीपुरवठा

वाघोली परिसरात दीर्घकाळापासून पाणीटंचाई ही एक गंभीर समस्या होती. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. या समस्येचे कायमस्वरूपी समाधान व्हावे यासाठी विविध पातळ्यांवर सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले. आंदोलने, जनजागृती, प्रशासनिक पाठपुरावा आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आज वाघोलीला टंचाईमुक्त करण्याच्या दिशेने भक्कम पावले उचलण्यात आली आहेत.

PMRDA पाणीपुरवठा योजना

वाघोलीच्या पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून PMRDA पाणी योजना मंजूर करून घेण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करण्यात आले. शासनदरबारी व अधिकाऱ्यांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला गेला. जनजागृती मोहीम राबवत आंदोलनदेखील करण्यात आले.

  • 2019 साली, स्व. मा. आमदार बाबुराव पाचार्णे साहेब व माजी खासदार श्री. शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून ₹22 कोटींच्या या योजनेला मंजुरी मिळाली.
  • आ. माऊली आबा कटके यांच्या पुढाकाराने अधिकाऱ्यांच्या व ठेकेदारांच्या बैठका घेऊन कामाला गती मिळाली.
  • आज या योजनेमुळे वाघोलीचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे.

भामा आसखेड पाणीपुरवठा योजना

वाघोलीच्या दीर्घकालीन पाणी गरजांची पूर्तता करण्यासाठी भामा आसखेड पाणी योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ही योजना पुणे महानगरपालिकेने लोहगाव–वाघोलीसाठी मंजूर केली आहे. या योजनेसाठी वेळोवेळी महानगरपालिकेसोबत बैठकांचे आयोजन, शासनदरबारी पाठपुरावा करण्यात आला आहे.

  • तत्कालीन पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ही योजना मंजूर करण्यात आली. लवकरच या योजनेमुळे वाघोली परिसरात नियमित आणि शाश्वत पाणीपुरवठा शक्य होणार आहे.

स्थानिक पातळीवरील पाणी वितरण आणि रचना सुधारणा

वाढत्या नागरी वस्तीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायत व पुणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून अनेक स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

  • मदर-मेरी सोसायटी, साईराज पार्क 1-2-3, इंकाई सोसायटी, फुलमळा रोड या भागात पाणी वितरणनलिकांचे काम पूर्ण- (₹26,47,443 निधी)
  • नगर रोड ते तांबे हाऊस, विनायक पार्क ते खंडोबा मंदिर, बालाजी पार्क ते बालाजी विहीर या मार्गांवर पाण्याच्या लाईनचे काम- (₹15,81,965 निधी)
  • वार्ड क्रमांक ६ मधील सर्व भागांमध्ये पाणी पोहोचवण्यासाठी जलवाहिन्या टाकणे, टाकलेल्या लाईन्सची वेळोवेळी डागडूजी करण्यात आली.