महिला सक्षमीकरण

महिला सक्षमीकरण

वाघोली परिसरात महिला सक्षमीकरण, उद्योजकता, कलेला वाव आणि खेळाला प्राधान्य देण्यासाठी विविध उपक्रमांमधून रत्नदीप सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. रत्नमाला संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली एक नवसंजीवनी निर्माण झाली आहे.

भव्य रांगोळी आणि मेहंदी स्पर्धा

विद्यार्थीनींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या हेतूने रत्नदीप सोशल फाउंडेशन, पूजा मेहंदी आर्टिस्ट आणि BJS कॉलेज  यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रांगोळी व मेहंदी स्पर्धेचे आयोजन BJS कॉलेजच्या परिसरात करण्यात आले. शेकडो स्पर्धकांनी भाग घेऊन अत्यंत देखण्या व आकर्षक कलाकृती सादर केल्या.

‘लाडकी बहिण’ महिला सक्षमीकरण कार्यशाळा

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी “लाडकी बहिण सक्षमीकरण कार्यशाळा” दिनांक 3 मार्च ते 9 मार्च 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत मेहंदी, रांगोळी, नथ मेकिंग, फ्लॉवर ज्वेलरी, रुखवत, ब्रायडल साडी पॅकिंग, प्रेस नेल आर्ट, सेल्फ मेकअप आणि हेअर स्टाईल यांसारख्या कौशल्यांचा समावेश होता. या उपक्रमात 1000 पेक्षा जास्त महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या कार्यशाळेतील महिलांसाठी विशेष: मेहंदी व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली, आणि त्याचा बक्षिस वितरण समारंभ Wagholi Flea Nest या भव्य कार्यक्रमादरम्यान 20 हजार पेक्षा अधिक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Wagholi Women’s Cricket Premier League 2024–25

वाघोलीमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेली महिला क्रिकेट स्पर्धा म्हणजे Wagholi Women’s Cricket Premier League 2024–25 ही एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद बाब ठरली. या स्पर्धेत एकूण 53 महिलासंघ आणि 600 हून अधिक महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता महिलांना क्रीडाक्षेत्रातही सक्षमतेने उभं राहण्याचं व्यासपीठ ठरली.

5000 पेक्षा अधिक नागरिकांनी मैदानावर उपस्थित राहून स्पर्धकांना भरभरून प्रोत्साहन दिले. नागरिकांचा हा प्रतिसाद लक्षात घेता पुढील सिझनची घोषणा लवकरच केली जाणार आहे.

Wagholi Flea Nest 2025 – महिला उद्योजिकांसाठी भव्य फ्ली मार्केट

वाघोलीमध्ये प्रथमच मोठ्या स्तरावर आयोजित Wagholi Flea Nest 2025 हा एक आगळावेगळा उपक्रम ठरला. महिला उद्योजिकांना आपल्या उत्पादन- सेवा याद्वारे थेट ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी मजबूत व्यासपीठ मिळावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या फ्ली मार्केटमध्ये 200 हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले, जिथे स्थानिक महिला उद्योजिकांनी खाद्यपदार्थ, हस्तकला, वस्त्र, सजावटीच्या वस्तू, बेकरी उत्पादने, सौंदर्यप्रसाधने इत्यादी क्षेत्रांमधील आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. 20,000 पेक्षा अधिक नागरिकांनी कार्यक्रमाला भेट दिली, ज्यामुळे वाघोलीच्या सांस्कृतिक आणि आर्थिक व्यवहाराला मोठी चालना मिळाली.

या उपक्रमाला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, Wagholi Flea Nest हा कार्यक्रम दरवर्षी अधिक व्यापक आणि आकर्षक स्वरूपात घेण्यात येईल, असा संकल्प करण्यात आला आहे.